Share

जो महाराष्ट्र वर्षभरात १ लाख ९० हजार कोटी जीएसटी देतो त्या महाराष्ट्राला काय मिळाले?

Published On: 

मुंबई – भाजपवाले आत्मनिर्भर होणारच…पंतप्रधानही आत्मनिर्भर होणारच…त्यांची ती घोषणाच आहे. सवाल हा आहे की, अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रसरकारला केला आहे.

जो महाराष्ट्र वर्षभरात १ लाख ९० हजार कोटी जीएसटी देतो त्या महाराष्ट्राला काय मिळाले. ज्याठिकाणी निवडणूका आहे त्याठिकाणी २५ हजार कोटी… ३५ हजार कोटी… महाराष्ट्राला काय दिले… या महाराष्ट्रात संपूर्ण भारत राहतो परंतु देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसला नाही असा जोरदार हल्ला छगन भुजबळ यांनी केला.

ज्या राज्यात निवडणूका आहेत त्या राज्यात म्हणूनच अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. परंतु हेही मिळताना कठीण आहे. त्यासाठी बिहारची निवडणूक आठवा… १० हजार कोटी… २० हजार कोटी… दीड लाख कोटी जाहीर झाले ते मिळाले का? निवडणूक संपली सगळं खतम असे सांगतानाच ३५ हजार… ६५ हजार कोटी रुपये निवडणूकपूर्वी खर्च होणार आहे का? असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!