मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. तर राज्य सरकार सगळंं ठीक आहे,असे आभासी चित्र उभं करत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अजून शेतकरी वर्गासाठी कोणतीही घोषणा नाही. तर व्यवसायिकांना अद्याप कोणताच दिलासा दिला नाही. त्यामुळे या सरकारला जाग येण्यासाठी भाजपने महाराष्ट्र बचाओ आंदोलन पुकारले आहे.
#महाराष्ट्र_बचाओ : राज्य सरकारला जाग येण्यासाठी ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ भाजपने दिला नारा !
असे असतानाच भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्ताच महाआघाडी तोडावी अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवून टाकतील, असा इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णतः अपयशी : आ. सुभाष देशमुखांची टीका
महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे असमर्थ आहेत. अशावेळी राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो असे ते म्हणाले.
‘रेल्वे उपलब्ध असूनही राज्यशासनाकडून योग्य पाऊले न उचलल्याने मजूर पायी निघाले’
दरम्यान सरकारला जाग येण्यासाठी भाजपने महाराष्ट्र बचाओ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे स्वरूप कसे असेल याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, 22 तारखेला मेरा अंगण मेरा रणागंण महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आपल्याला आपल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून राज्य सरकारचा निषेध करावा. यावेळी निषेध व्यक्त करणारं रिप्लेक्शन म्हणून काळे बोर्ड, काळे टी शर्ट, काळी रीबीन, काळे मास्क, काळे शर्ट, काळ्या ओढण्या अशा गोष्टींचा वापर करावा.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

