सोलापूर : कोरोनाचे संकट हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे असा आरोप भाजपने केला आहे.याविरोधात भाजपातर्फे काल राज्यभर स्थानिक प्रशासनाला निवेदन दिली गेली आहेत. द.सोलापूर तालुक्यात माजी मंत्री सुभाष देखमुख यांनी देखील तहसीलदारांना याचसंदर्भात निवेदन दिले.
देशमुख यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे. या पोस्ट मध्ये देशमुख म्हणतात,कोरोना महामारीच्या विळख्यात अडकलेला आपला महाराष्ट्र व यामुळे जनतेची होणारी बिकट अवस्था या गोष्टी अत्यंत चिंताजनक आहेत. या कठीण काळात सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत कोणतेही सक्षम निर्णय घेतले जात नाहीत ही बाब चिंतेची आहेच पण संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी धोक्याची आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत, कोणतेही सक्षम निर्णय घेतले जात नाहीत. शासनाचे हे अपयश सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
#corona : कोरोनात राज्य सरकार निष्क्रिय, राज्यपालांची भेट घेऊन फडणविसांनी घेतला समाचार
पुढे देशमुख म्हणतात, पोलीस, डॉक्टर्स, शासकीय प्रशासकीय अधिकारी यांना पुरेसे बळ उपलब्ध न होणे हे अधिक दुर्दैवी आहे. केंद्रातून ट्रेन उपलब्ध होऊन देखील महाराष्ट्रात निव्वळ राज्यशासनाकडून योग्य पाऊले न उचलल्याने प्रवासी मजदूर पायी आपल्या भागाकडे निघत आहेत. केंद्रातून वेळीच धान्य येऊन सुद्धा ते सर्वांपर्यंत योग्य पद्धतीने पोचत नाहीये. कोरोना उच्चाटनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या या लॉकडाऊनमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या शून्य नियोजनामुळे समाजातील सर्व स्तरांतील जनतेसमोर विविध अडचणी निर्माण होत आहेत आणि त्या सोडवण्यात हे सरकार संपूर्ण अपयशी ठरत आहे.
देशमुख म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून दक्षिण सोलापूर मतदारसंघातील व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची समस्या दूर करणे हे माझे कर्तव्य आहे. वारंवार शासनापर्यंत मागण्या पोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, परंतु वरिष्ठ शासनपातळीवरून सकारात्मक मदत उपलब्ध होताना दिसत नाहीये. आज पुन्हा जनतेच्या सर्व मागण्यांचे निवेदन मा. तहसिलदार, मंद्रूप, मा. तहसिलदार, दक्षिण सोलापूर, मा. तहसिलदार उत्तर सोलापूर, प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी यांना केले आहे. योग्य निर्णय घेऊन आपल्या राज्याला या संकटातून बाहेर काढण्याची ही वेळ आहे. यासाठी माझ्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न मी करत आहे व त्यांना नक्की यश मिळेल असा मला विश्वास वाटतो.
शरद पवारांनी पंतप्रधानांप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहावे, फडणविसांनी हाणला टोला
दरम्यान, स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या, गरिबांना रेशनधान्य न मिळणे, आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली असणे, रुग्णसंख्या लपविणे, मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन न करणे अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे.इतर सर्व राज्य विविध घटकांसाठी पॅकेज देत असताना राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवीत आहे अशी टीका देखील भाजपकडून केली जात आहे.
घाबरू नका हवा बदलत आहे – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

