मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. तर राज्य सरकार सगळंं ठीक आहे,असे आभासी चित्र उभं करत आहे. अजून शेतकरी वर्गासाठी कोणतीही घोषणा नाही. तर व्यवसायिकांना अद्याप कोणताच दिलासा दिला नाही. त्यामुळे या सरकारला जाग येण्यासाठी भाजपने महाराष्ट्र बचाओ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे स्वरूप कसे असेल याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.
ते म्हणाले की, 22 तारखेला मेरा अंगण मेरा रणागंण महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आपल्याला आपल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून राज्य सरकारचा निषेध करावा. यावेळी निषेध व्यक्त करणारं रिप्लेक्शन म्हणून काळे बोर्ड, काळे टी शर्ट, काळी रीबीन, काळे मास्क, काळे शर्ट, काळ्या ओढण्या अशा गोष्टींचा वापर करावा.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र आणि केरळची तुलना केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण 9 मार्चला सापडला. त्याच दिवशी केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला. केरळाची संख्या 70 दिवसात 1 हजार क्रॉस झालेली आहे आणि महाराष्ट्रातील 70 दिवसाची संख्या ही 40 हजार झाली आहे. केरळमध्ये मृतांची संख्या 12 क्रॉस झालेली नाही. पण महाराष्ट्रातली मृत्यूची संख्या 1300 क्रॉस होऊन 1400 कडे निघाली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे उदाहरण आहे.
या 70 दिवसात भारतीज जनता पार्टीने आणि सामान्य जनतेने संकट खूप मोठे आहे म्हणून सहकार्य केले पाहिजे अशी भूमिका ठेवली. पण आता लोकं सुद्धा त्यांच्या मनातला राग लपवू शकत नाही आणि विरोधी पक्ष म्हणून भारीतय जनाता पार्टी आपली भूमिका बजावत राहील. महाराष्ट्र सरकराने आतापर्यंत केंद्र काय देते केंद्र काय देत करत करत महाराष्ट्राने स्वत:चे पॅकेज घोषित केले नाही. हातावर पोट असणाऱ्यांना सरकारने पॅकेज घोषित केले पाहिजे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

