Share

महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णतः अपयशी : आ. सुभाष देशमुखांची टीका

Published On: 

सोलापूर : कोरोनाचे संकट हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड, शेतकर्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रेशनधान्याचे वितरणही व्यवस्था होत नाही. रुग्णसंख्या लपविली जात आहे, यासह अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. पोलिसांची अवस्था तर अतिशय विदारक आहे.राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची खरमरीत टिका आ. सुभाष देशमुख यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी आणि दक्षिण व उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांना निवेदन देऊन राज्य सरकारच्या नाकर्तेपणाकडे लक्ष वेधले.

कोरोनाच्या संकटातही महाआघाडी सरकार राजकारण करत आहे. प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवायचे आणि दुसरीकडे विधान परिषद निवडणूक बिनविरोध कशी होईल याबाबत हालचाली करायच्या. वास्तविक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत. देशात नागरिकच नाही तर पोलिसही सुरक्षित राहिलेले नाही. पोलिस कोरोनाग्रस्तर तर झालेच आहेत शिवाय त्यांच्यावर हल्ले होण्याचे प्रमाणही वाढले आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. केंद्राने वेळोवेळी कोरोनासाठी राज्याला पैसे दिले आहेत, ते कुठे गेले याचा पत्ता नाही. याचा हिशोब लवकरात लवकर जनतेसमोर सादर करावा, अशी मागणी आ. देशमुख यांनी केली. निवेदन देताना आ. सुभाष देशमुख यांच्यासह जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी जिल्हाधिकारी तसेच निवेदन दिले.

डॉक्टरांना लवकरात लवकर सरंक्षण कीट उपलब्ध करू : आ. देशमुख

आ. देशमुख यांनी केलेल्या प्रमुख मागण्या : 
आ. सुभाष देशमुख यांनी यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या. यामध्ये प्रामुख्याने कोरानासाठी काम करणार्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व सिव्हीलमध्ये काम करणार्या सर्व कर्मचार्यांना सुरक्षेची साधने द्यावीत, नागरिकांना रेशनधान्याचे वितरण सुरळीत करावे, लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग ठप्प आहेत. त्यांना पुढील काळात शासनाकडून मदत मिळवून द्यावी, पत्रकारांना विम्याचे सरंक्षण द्यावे, शेतकर्यांसाठी बेदाणे ठेवण्यासाठी स्टोअरेज उपलब्ध करून द्यावेत, अंगणवाडी सेविकांचे थकलेले मानधन त्वरित द्यावे, डॉक्टरांची स्वतंत्र टीम करून, घरोघरी जाऊन विविध आजाराचा सर्व्हे करावा, प्रत्येक जिल्ह्यात स्वॅब टेस्टींगचे स्वतंत्र युनिट सुरू करावे, ग्रामीणमधील युवकांना गावातच चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून द्यावा, सध्या उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे विज बिल, टॅक्स माफ होईल का याचा विचार करावा, हॉटेल व्यावसायिकासाठी चांगले पॅकेज द्यावे, कजार्च हफ्ते आणखी तीन महिने पुढे ढकलावेत, सोलापुरात विमानसेवा सुरू करावी, युवकांसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करावेत यासह अनेक मागण्या केल्या.

सोलापूर जिल्हा बेकरी उत्पादनात अग्रेसर करा : आ. सुभाष देशमुख

मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमान्यांना शासनाने आपल्या गावी जाण्याची परवानगी द्यावी !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!