मुंबई: राज्यात चाललेल्या ईडीच्या कारवायांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. “राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, मात्र माझं मत विचारलं तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही” असं जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. यावर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्र द्रोह आहे. स्वतः मंत्री पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राबद्दल अशा पद्धतीचं गंभीर वक्तव्य करून देशामध्ये महाराष्ट्र हे किती बिकट पद्धतीने चाललेलं राज्य आहे असा प्रचार करत असेल तर हा महाराष्ट्र द्रोह नाही तर काय?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

