🕒 1 min read
पुणे : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा थैमान वाढला आहे. यामुळे, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात आजपासून हॉटेल, बार, रेस्टोरंट बंद करण्याचे आदेश देण्यात असून परगावातून आलेल्या वा घरच्या घरी जेवणाची सोय ज्यांची होऊ शकत नाही अशा नागरिकांसाठी पार्सल सुविधा सुरु ठेवण्यात आली आहे.
प्रत्यक्षात हॉटेलला जाऊन पार्सल घेणे हे धोकादायक व सोयीस्कर नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक हे झोमॅटो वा स्विगीद्वारे आपले जेवण मागवत असतात. मात्र, ऐन जेवणाच्या वेळी या दोन्ही फूड डिलिव्हरी कंपन्या ठप्प झाल्या आहेत. अचानकपणे ऍप व सेवा बंद पडल्याने ग्राहक देखील गोंधळात सापडले असून अनेकांनी याबाबत ट्विटरवर ट्विट केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारने काल जाहीर केलेल्या नियमावली नुसार केवळ सकाळी ७ ते रात्री ८ दरम्यानच टेक अवे वा पार्सलसाठी हॉटेल्स व फूड डिलिव्हरी कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे.
Zomato goes dark as Mumbai goes into lockdown. pic.twitter.com/aZELkPempS
— Harneet Singh (@Harneetsin) April 5, 2021
महाराष्ट्रात आज रात्री ८ नंतर कडक निर्बंधांची सुरुवात करण्यात आली असून संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार रात्री ८ वाजल्यापासून या दोन्ही कंपन्या देखील बंद पडल्यामुळे ज्या लोकांना याची पूर्वकल्पना नव्हती त्यांना मात्र असुविधेला जावे लागले आहे. तर, जेवणाची पर्यायी सेवा देखील उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
Hey kiran, sorry to hear that you're experiencing a hassle with our app. It would be very helpful if you could share the screenshots of the issue and we shall have this checked right away.
^Arjun— Swiggy Cares (@SwiggyCares) April 5, 2021
@Zomato what the he'll is this ? pic.twitter.com/qmYTwARTQ4
— Pratik Amin (@iPratik_HRD) April 5, 2021
https://twitter.com/zainalhussain27/status/1379095932470353922?s=20
महत्वाच्या बातम्या
- राठोड गेले, देशमुख गेले, आता अनिल परबांचा नंबर : किरीट सोमय्यांचे भाकीत
- ‘आबांनंतर आदर्श गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांना पाहिले गेले, मात्र भाजपमुळे…
- एमआयएमच्या शाहनवाज खानसाठी खैरेंचा दबाव – सत्तारांचा गंभीर आरोप
- राज ठाकरेंचे भाकीत पुन्हा खरे ठरले, फटाक्याची माळ लागण्यास सुरवात झाली !
- शरद पवारांचा ‘पी.ए’ ते थेट महाराष्ट्राचा गृहमंत्री… दिलीपराव वळसे पाटील यांचा थक्क करणारा प्रवास !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
