Share

राठोड गेले, देशमुख गेले, आता अनिल परबांचा नंबर : किरीट सोमय्यांचे भाकीत

Published On: 

मुंबई : अखेर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांविरोधात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नैतिकतेचे भान राखून राजीनामा देण्याची तयारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती.

परंतु आता महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी संजय राठोड गेले अनिल देशमुख गेले आता अनिल परबही जातील. आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील, अशी स्फोटक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ते आज औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलत होते.

किरीट सोमय्या यांनी यानंतरचा नंबर अनिल परब यांचा असणार आहे, असे थेट वक्तव्य परब यांचे नाव घेऊन केले आहे. त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सोमय्या यांनी परब यांचे थेट नाव नेमके का घेतले ?, असा महत्त्वाचा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. दरम्यान, सोमय्या यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशी फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील. असा घणाघात राज ठाकरे यांनी केला होता. आता या प्रकरणात अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा लागल्याने राज ठाकरेंचे भाकीत खरे ठरल्याचे बोलेले जात आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यानंतर कोणाचा नंबर लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!