Share

‘आबांनंतर आदर्श गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांना पाहिले गेले, मात्र भाजपमुळे…’

Published On: 

पुणे : अखेर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांविरोधात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नैतिकतेचे भान राखून राजीनामा देण्याची तयारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती.

यानंतर, शरद पवार यांनी होकार दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये विविध प्रकरणांवरून भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून ते थेट दिल्लीसाठी रवाना झाल्याचे समजत आहे.

दरम्यान, भाजपच्या विविध नेत्यांनी अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. तर, राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गृहमंत्रीपद अत्यंत सक्षमपणे सांभाळणाऱ्या दिवंगत आर आर पाटील यांच्यानंतर अनिल देशमुख यांना आदर्श गृहमंत्री पाहिले गेल्याचे विधान त्यांनी केले आहे.

‘अनिल देशमुख साहेबांनी इतके वर्ष राजकीय कारकीर्द सांभाळली ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचारचे आरोप झाले नव्हते. मंत्रीमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणुन आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले. भाजपाच्या सुडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला. वेदनादायी.’ असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!