Share

एमआयएमच्या शाहनवाज खानसाठी खैरेंचा दबाव – सत्तारांचा गंभीर आरोप

Published On: 

औरंगाबाद : माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकात खैरे यांनी एमआयएमचे शाहनवाज खान यांना संचालकपदी घेण्यासाठी दबाव टाकला असल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. सोमवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांच्या निवडणुकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये सत्तार बोलत होते. खैरेंना एमआयएमचा कार्यकर्ता चालतो पण आम्ही चालत नाही, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, मंत्री संदीपान भूमरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच शिवसेनेच्या इतर नेते, पदाधिकारी यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये म्हणावी तेवढी मदत केली नाही. तसेच पुढाकार देखील घेतला नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या या भूमीकेवर रिपोर्ट तयार करुन तो पक्ष श्रेष्ठींना पाठवणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. शिवसेनेच्या इतिहासामध्ये प्रथमच ही बँक ताब्यात आली आहे. या मध्ये अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष देखील शिवसेनेचा आहे. त्यामुळे आता चिंता करण्याचे काही कारण नसल्याचे सत्तार म्हणाले. एवढेच नाही तर निवडणुकीत साथ न देणाऱ्यांचा ‘हिशेब’ पूर्ण करणार असल्याचेही ते म्हणाले.

निवडणूक झाल्यानंतर आमदार अंबादास दानवे, मंत्री संदीपान भूमरे हे पत्रकार परिषद घेण्याअगोदरच बँकेच्या परिसरातून निघुन गेले होते. याचा धागा पकडून सत्तार यांनी शिवसेनेच्या माजी खासदारावर तोंडसुख घेतले. निवडणुकीअगोदर अब्दुल सत्तार, अंबादास दानवे, संदीपान भूमरे हे हरिभाऊ बागडेंच्या शेतकरी विकास पॅनलच्या सोबत गेले. तेव्हा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पॅनेलला शेवटी शेवटी साथ दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!