मुंबई : उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर विविध याचिकांवर झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नैतिकतेचे भान राखून राजीनामा देण्याची तयारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचा खळबळजनक आरोप केले होते. या आरोपांवरून वकील जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. आता अनिल देशमुख दिल्ली गाठून सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे देशमुख उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात दाद देणार का ? याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशी फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील. असा घणाघात राज ठाकरे यांनी केला होता. आता या प्रकरणात अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा लागल्याने राज ठाकरेंचे भाकीत खरे ठरल्याचे बोलेले जात आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यानंतर कोणाचा नंबर लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झालीये; भाजपची खरमरीत टीका
- …आणि म्हणे शिवसेनेचा भगवा फडकला?
- महाराष्ट्रात महावसुलीचे सरकार आहे; उद्धव ठाकरे तुमची नैतिकता कोठे आहे? – रविशंकर प्रसाद
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा दिलाच पाहिजे : रामदास आठवले
- पंढरपूर पोटनिवडणूक : रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि संजय शिंदे यांची गुप्त बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
