औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणेच वादळी ठरली. अनेक विषयांप्रमाणेच ऑनलाईन सभा घेण्यावरुन जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कोरोना नियमांमुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात येत होती. मात्र, आता अनलॉक नंतर सभा ऑनलाईन घेण्यात येवू नये अशी मागणी काही सदस्यांनी केली होती. मात्र, प्रशासनाने या वेळी देखील ऑनलाईन सभा आयोजित केली. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने सभागृहात घेण्याविषयीची मागणी करूनही त्याला प्रशासनाने केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. या निषेधार्थ जि.प. सदस्य मधुकर वालतुरे, किशोर पवार, प्रकाश चांगुलपाचे यांनी काळे मास्क लावून निषेध नोंदविला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
कोरोना काळात घेण्यात आलेल्या ऑनलाईन सभेत सदस्यांना मुद्दा मांडण्यात अडचण येत होती. अनेक सदस्यांना तर आपला विषय नीट मांडताही आला नाही. त्यात आता कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाही ऑफलाईन घेण्याची मागणी करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला मोठा दिलासा ; आज राज्यात तब्बल ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
- ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे निर्देश!
- ‘औरंगजेबाने वारीची परंपरा संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले ; सरकारने हे पाप करू नये’
- ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचं स्वागत, मात्र ते भाजपच्या मिठाला जागल्यासारखं बोलतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

