🕒 1 min read
सिल्लोड : शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिन व्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाची ग्रामसभा स्तरावर जनजागृती करून प्रभावीपणे अंमलबजावणी करा. अर्थसहाय्याबाबत शेतकऱ्यांच्या समस्यांची सन्मानाने सोडवणूक करून मागील वर्षाच्या तुलनेत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वाढवून ३० जून च्या आत शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. सोमवारी ( दि. १४) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तालुक्यातील खरीप पीककर्जाबाबत आढावा बैठक संपन्न झाली.
पुढे बोलत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यातच कोरोना संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते बियाणे घेण्यासाठी वेळेत पैसे मिळाले पाहिजे. शेतकरी सावकाराच्या तावडीत जावू नये यासाठी सरकार विविध योजना आखत आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेवून पिककर्जा साठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
कर्ज मागणीसाठी ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन चा पर्याय ठेवावा, बँकांनी गावात ग्रामसभा घेऊन पीककर्ज, शैक्षणिक कर्ज अशा विविध योजनांची माहिती देवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शासनाच्या ३ लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे, राज्य शासनाने ३ लाख रुपयांपर्यंत हमी घेतलेली आहे. याचे व्याज सरकार भरणार आहे त्यामुळे बँकांनी याची चिंता करू नये असे स्पष्ट करीत यापुढे शेतकऱ्यांची तक्रार येता कामा नये, नवीन कर्जदारांच्या संचिका तात्काळ निकाली काढून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिककर्जाचा लाभ द्या असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन सतर्क, दररोज होत आहेत ‘इतक्या’ चाचण्या!
- इंग्लंडवर 1-0 विजयाने न्युझीलंडने संपवला 22 वर्षे जुना वनवास
- दुर्दैवी घटना! खड्ड्यात साचलेल्या पाण्यात चारचाकी बुडून चौघांचा मृत्यू
- आमदार पेप्सी खायला वेळ देतात पण पोल्ट्री मधील शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही
- सोशल मीडियावर मैत्रीच्या जाळ्यात अडकली पोलीस निरीक्षक, तिघांविरोधात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
