Share

महाराष्ट्राला मोठा दिलासा ; आज राज्यात तब्बल ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत.

मागील काही दिवसांची आकडेवारी पाहता राज्याचा रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आज १४,७३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५६,५४,००३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५% एवढे झाले आहे.

आज राज्यात ८,१२९ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज २०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ (१५.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४९,२५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,९९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!