मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ६ जून रोजी रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. अखेर, आज ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे भेटले आहेत. या भेटीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं होतं. या भेटीनंतर दोन्ही राजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि इतर समस्या सोडवण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
आता या भेटीवर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील या भेटीवर भाष्य केलं आहे. या भेटीचं स्वागत करतानाच त्यांनी दोन्ही राजांच्या भूमिकेवर टीका देखील केली आहे. ते भाजपच्या मिठाला जागल्यासारखं बोलतायत, असं टीकास्त्र अरविंद सावंत यांनी सोडलं आहे.
‘मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागतंच आहे. पण दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहे. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबद्दल ते बोलत नाही. तर मिठाला जागल्यासारखं ते बोलत आहेत,’ असं अरविंद सावंत म्हणाले. यामुळे अरविंद सावंत यांच्या या टीकेनंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीसह भाजपच्या नेत्यांनी देखील दोन्ही राजे एकत्र आल्याने स्वागत केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोणताही घोटाळा नाही ‘हे’ आरोप राजकीय द्वेषापोटी’ ; राम मंदिर ट्रस्टचे स्पष्टीकरण
- पुण्यात निर्बंध आणखी शिथिल झाल्यानंतरही रुग्णसंख्येत घट कायम; ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३ हजारांच्या आत
- ‘सॉफ्ट सिग्नलचा नियम आयसीसीने रद्द करावा’, स्टुअर्ट ब्रॉडने केली मागणी
- आमदार पेप्सी खायला वेळ देतात पण पोल्ट्री मधील शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही
- राज्यकर्त्यांना देशाची फाळणी करायचीये; उदयनराजेंचा गंभीर आरोप


