Share

आसारामला वेगळा न्याय आणि झाकीर नाईकला वेगळा न्याय का ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- न्यायिक लवादाने इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा प्रमुख झाकीर नाईक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) फटकारले आहे. न्या. मनमोहन सिंग यांनी नाईकची सील केलेली संपत्ती ईडीच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. ईडीने मागील १० वर्षे शारीरिक शोषणाचा आरोप असलेल्या आसारामची संपत्ती जप्त करण्याबाबत काहीच कारवाई केलेली नाही. पण नाईकप्रकरणी ते खूपच जलदगतीने काम करताना दिसत आहेत, मी अशा १० महाराज-बाबांची नावे सांगू शकतो, ज्यांच्याकडे १० हजार कोटींहून अधिक संपत्ती आहे आणि त्यांच्याविरोधात गुन्हेगारीविषयक खटलेही सुरू आहेत. तुम्ही यापैकी एकाच्या विरोधात तरी कारवाई केलीय का, असा रोकठोक सवाल न्या. मनमोहन सिंग यांनी ईडीच्या वकिलांना विचारला आहे .

काय म्हटलं आहे न्या. मनमोहन सिंग यांनी ?

जेव्हा आरोपपत्रातच अपराध निश्चित करण्यात आलेले नाही. मग संपत्ती जप्त करण्यासाठी काय आधार आहे नाईकने आपल्या भाषणाच्या जोरावर युवकांना भडकवल्याचे ईडीच्या वकिलांनी सांगितले. ईडीने याप्रकरणी कोणताही सकृतदर्शनी पुरावा किंवा नाईकच्या भाषणामुळे दहशतवादी कृत्यात उतरल्याचा एखाद्या युवकाचा जवाब सादर केलेला नाही. ईडीने मागील १० वर्षे शारीरिक शोषणाचा आरोप असलेल्या आसारामची संपत्ती जप्त करण्याबाबत काहीच कारवाई केलेली नाही. पण नाईकप्रकरणी ते खूपच जलदगतीने काम करताना दिसत आहेत, मी अशा १० महाराज-बाबांची नावे सांगू शकतो, ज्यांच्याकडे १० हजार कोटींहून अधिक संपत्ती आहे आणि त्यांच्याविरोधात गुन्हेगारीविषयक खटलेही सुरू आहेत. तुम्ही यापैकी एकाच्या विरोधात तरी कारवाई केलीय का,ढाका येथे २०१५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रकरणात या भाषणांची भूमिका काय होती, याचा तुमच्या आरोपपत्रात उल्लेख आहे का? असेही न्यायमूर्तींनी विचारले. मला वाटतं, आपल्या सोयीसाठी ईडीने ९९ टक्के भाषणाकडे दुर्लक्ष केले असल्याचेही ते म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!