Share

…अन् ‘हुतुतू-हुतुतू’ खेळू लागले जिल्हा परिषदेचे कर्मचारी

Published On: 

औरंगाबाद : ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियानांतर्गत औरंगाबाद तालुक्याच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहेत. यात जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी यांच्यातील क्रीडा स्पर्धांना शनिवार, ६ फेबुवारी रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली.

क्रीडा स्पर्धेचे उदघाटन जि.प. अध्यक्षा मीना शेळके, पंचायत समिती सभापती छाया घोगरे, क्रिडा उपसंचालक उर्मिला मोराळे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, गटशिक्षणधिकारी जयश्री चव्हाण, विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, जिवरख नाना, मनिषा वाशिगे, विदया दिक्षीत यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. जि प शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नियमितपणे या स्पर्धा व्हाव्यात अशी सर्व जि. प. शिक्षक व कर्मचारी यांची इच्छा होती. त्यानुसार या स्पर्धा होत आहेत.

या स्पर्धेत कबड्डी, खोखो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, धावणे यासह सर्वच स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी उत्साहात सहभाग नोंदवून आपल्या क्रीडागुणांना वाव दिला. यावेळी पंच म्हनूण सोमीनाथ पळसकर, सुरेश पठाडे, बाळासाहेब सारूक, प्रविण लोहाडे, प्रमोद सोनवणे, विलास राजपूत, उषा सलामपुरे, मधुकर दसपुते, कल्याण जाधव यांनी पंचायत समिती कार्यालयास सहकार्य केले तसेच विजय साळकर, प्रकाश दाणे, रंजित राठोड, कालीदास रणनवरे, राजेंद्र मुळे, कडुबा साळवे, विलास चव्हाण, दर्शन पाराशर, बाबासाहेब जाधव आदींनी यासाठी परिश्रम घेतले. स्पर्धचे सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी तर आभार बालाजी फुले यांनी मानले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!