औरंगाबाद : संयुक्त किसान मोर्चाच्या आदेशानुसार औरंगाबादेत पैठण गेट, फुलंब्रीतील आळंद, सिल्लोड, गंगापूर येथील शेंदुरवादा, वाळूज या ठिकाणी रास्ता रोको करून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
शेतकरीविरोधी धोरणाना कायद्याचे स्वरूप देऊन अदानी-अंबानी धार्जीणे धोरणाचा धडाका लावणाऱ्या केंद्र सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध केला. शेतकऱ्यांनाच आतंकवादी म्हणून हिणवून आणि त्यांच्यावर तसेच पञकारांवरही खोट्या केसेस दाखल करण्यापर्यंत मजल मारली आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा आरोप उपस्थित शेतकरी नेत्यांनी केला आहे. दिल्लीच्या सीमांवर खंदक खोदून, खिळे लावून देशातील नागरिक शेतकऱ्यांना शत्रूप्रमाणे वागणूक देऊ नये, शेतकऱ्यांसमोर नम्रता दाखवावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.
देशव्यापी चक्काजाम आंदोलनाचा भाग म्हणून औरंगाबाद येथे पैठण गेट, फुलंब्री येथील आळंद, सिल्लोड, गंगापूर येथील शेंदुरवादा , वाळुज येथे रास्तारोको करण्यात आला. आळंद येथे काॅ राम बाहेती, काॅ अशोक जाधव, काॅ काकासाहेब तायडे यांच्या नेतृत्वाखाली, सिल्लोड येथे काॅ सय्यद अनिस, काॅ बाळु पाटील, काॅ बाबुराव पठाडे, यांच्या नेतृत्वाखाली, शेंदुरवादा येथे काॅ विलास शेंगुळे, वाळुज येथे काॅ अभय टाकसाळ, रतन अंबीलवादे, योगेश वाहुळ, किशोर सोनवणे, अमोल सरवदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले, तर औरंगाबादेत पैठण गेट येथे काॅ भगवान भोजने, उमाकांत राठोड, चंद्रकांत चव्हाण, काॅ अभय टाकसाळ, भाऊसाहेब झिर्पे, बुद्धिनाथ बराळ, सुनिल वाव्हळे, सुनिल राठोड, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. यावेळी पोलीसांनी अटक करून दुपारी सोडून दिले.
महत्वाच्या बातम्या
- व्हिडिओकॉनच्या कामगारांना मुख्यमंत्री ठाकरेंचे आश्वासन, लवकरच तोडगा काढणार
- मद्यपी तरुणाची डॉक्टरला मारहाण, वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल
- रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी खुशखबर; रेल्वेने सुरू केल्या ‘या’ नवीन रेल्वेगाडया
- अतिक्रमणधारकांचा अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांचे आदेश
- शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही: सुब्रमण्यम स्वामी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

