Share

जाणून घ्या कृषी कायद्यांच्या विरोधातील ‘चक्का जाम’ आंदोलनाला राज्यात कसा मिळाला प्रतिसाद

Published On: 

🕒 1 min read

पुणे : दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे असा आरोप आंदोलक करत आहेत.

आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले असल्याचा देखील आरोप होत आहे. आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठाही खंडित केला जात आहे. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे, अशी टीका करत संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.

सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व तीन कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने आज देशभर रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला संमिश्र असा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनाचा म्हणावा तितका प्रभाव पडला नसल्याचे चित्र आज दिसून आले.

दरम्यान,औरंगाबाद,नांदेड,पुणे,सोलापूर,मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.दरम्यान,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निफाड येथील शांतीनगर त्रिफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनकर्त्यांनी निफाडचे मंडळ अधिकारी बाळासाहेब निफाडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबादेतील टी पॉइंट, जळगाव हायवे रोड, पैठण रोड, जालना बदनापूर रोडरोड याठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर शहरातल्या दाभोळकर कॉर्नर परिसरात देखील असेच आंदोलन करण्यात आलं. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. ठाण्यामध्ये जय हिंद पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी कार्यकर्त्यांसह ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला.

आजच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत एमआयएम पक्षाचे धुळे शहराचे आमदार फारुक शाह यांनी धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुलीवर आज सकाळी रास्तारोको करीत चक्काजाम केला. आ.शाह यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरत केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला.अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील चक्का जाम आंदोलन केलं. अहमदनगर – शिर्डी महामार्गवर तब्बल २ तास स्वाभिमानी शेतकरी संघटनेंच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शनिवारी सकाळी राजूर चौफुली येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पुण्यातील हडपसर रस्त्यावर करणार चक्काजाम आंदोलन करण्यात आले.काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.आंदोलनस्थळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.बाणेर व वारजे येथे शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, आंदोलनामुळे मुंबई- बेंगलोर महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!