मुंबई : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
प्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर बराच वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे आता बॉलिवूड आणि हॉलिवूड असा वाद रंगला आहे. यात अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नीने बॉलिवूडकरांवर टीकास्त्र डागत त्यांना मुर्ख म्हटलं आहे.
बॉलिवूडमधील काही कलाकारांनी या कायद्यांच्या संदर्भात आणि यामुळे सुरु झालेल्या वादाबाबत उघडपणे भूमिका घेतली आहे. मात्र अनेक मोठे कलाकार या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत. जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पंजाबचा प्रसिद्ध सिंगर जॅझी बी(Jazzy B) याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत शाह यांनी बॉलिवूडच्या कलाकारांना झापलं आहे.
https://twitter.com/jazzyb/status/1357537318190546946?s=20
नेमकं काय म्हणाले आहेत शाह ?
“आपल्या फिल्म इंडस्ट्रीतले अनेक मोठमोठे धुरंदर लोकं शांत बसलेत. कारण, त्यांना खूप काहीतरी गमावण्याची भीती वाटतेय. अरे भाई… जर तुम्ही इतकं कमवून ठेवलंय की तुमच्या सात पिढ्या घरी बसून खाऊ शकतील, तर किती गमवालशांत राहणं अन्याय करणाऱ्यांना समर्थन देण्याइतकाच मोठा गुन्हा आहे.
दरम्यान, आता शाह यांनी या वादात उडी घेत धुरंदर कलाकारांना ललकारले आहे. आता तरी हे मोठे कलाकार याबाबत काही भूमिका घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- सामाजीक सुरक्षा कायद्यात उसतोड मजुरांचा समावेश करण्यात यावा: आमदार धस
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- भाजप-तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असताना आता नरेंद्र मोदी पुन्हा जाणार पश्चिम बंगालमध्ये
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

