Share

“तु माझ्यासाठी नेहमीच ‘चिकू’ राहशील” युवराजने लिहले विराटला भावनिक पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एक पत्र लिहले आहे. तसेच त्यांनी विराटला गोल्डन शूजसुद्धा गिफ्ट केले आहे. युवी सिनियर असून सुद्धा विराट आणि युवी यांच्यात घनिष्ट मैत्री आहे. युवीने पत्रात विराटचे कौतुक केले आहे. तसेच त्याचे समर्थनही केले आहे.

सोशल मिडीयावर टाकलेल्या पत्रात, युवराजने पत्रात लिहले “विराट, मी तुला क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून वाढताना पाहिले आहे. नेटमधील त्या तरुण मुलापासून जो भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून चालत असे, आता तू स्वत: एक दिग्गज आहेस. तुझी नेट्समधील शिस्त, मैदानावरील आवड आणि खेळाप्रती असलेले समर्पण या देशातील प्रत्येक तरुण मुलाला बॅट उचलण्याची आणि एक दिवस निळी जर्सी घालण्याचे स्वप्न पाहण्यास प्रेरित करते. तु प्रत्येक वर्षी तुमचा क्रिकेटचा स्तर उंचावला आहे आणि या अप्रतिम खेळात आधीच खूप काही साध्य केले आहे. तु एक महान कर्णधार आणि उत्कृष्ट लीडर आहेस. तुझ्या आतील आग नेहमी तेवत ठेवा. तू सुपरस्टार आहेस. तुझ्यासाठी हा खास गोल्डन बूट. देशाला अभिमान वाटावा असा खेळत राहा”

https://www.instagram.com/p/CaRIiaTvIA7/?utm_source=ig_web_copy_link

युवराज आणि विराट हे दोघे पुमा या ब्रॅण्डसाठी काम करतात. त्याचेच अवचित्य साधत युवराज सिंगने विराट कोहलीसाठी हे भावनिक आणि प्रेमळ पात्र लिहले आहे. युवीने केवळ सोशल मीडियावर नाही तर हाताने कागदावर हे पत्र लिहले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!