Share

“ तो भारताचा ३६० डिग्री स्टार खेळाडू आहे”; कायरान पोलार्डने केली भारतीय खेळाडूची प्रशंसा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वेस्ट इंडिजचा मर्यादित षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्डने भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवचे जागतिक दर्जाचे खेळाडू म्हणून कौतुक केले आहे. कायरान पोलार्डने भारताच्या विजयानंतर बोलताना सूर्यकुमार यादवने तोंड भरून कौतूक केले आहे. त्याने इतर खेळाडूंनी सूर्याकडून शिकावे असेही सांगितले आहे.

सूर्यकुमार यादव विंडीज विरुद्धच्या टी २० मालिकेत सामनावीर आणि मालिकावीर ठरला आहे. त्याने धुव्वादार बॅटिंगचे प्रदर्शन केले आहे. तसेच सूर्या आणि पोलार्ड आयपीएलमध्ये एकत्र मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहेत. सूर्याची प्रशंसा करताना पोलार्ड म्हणाला “सूर्या हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. २०११ मध्ये तो पहिल्यांदा आला तेव्हापासून मला त्याच्यासोबत मुंबई इंडियन्समध्ये खेळण्याची संधी मिळाली. तेव्हापासून तो खूप प्रभावी झाला आहे, हे पाहून आनंद झाला. ३६० डिग्रीचा खेळाडू म्हणून तो स्वत:साठी आणि भारतासाठी खूप चांगली कामगिरी करत आहे. सर्व फलंदाज त्याच्या पुस्तकातून एक पान काढू शकतात,आणि बॅटिंग कशी करावी हे शिकू शकतात”

सूर्यकुमार यादवने या मालिकेत अफलातून फलंदाजी केली आहे. तो मालिकेत सर्वाधिक धाव करणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्या सामन्यातील चांगल्या खेळीमुळे भारतीय संघाने सामने जिंकले आहेत. त्याने तीन सामन्याच्या मालिकेत एकूण १०७ धावा केल्या आहेत. सूर्याचा हा चांगला फॉर्म त्याला आगामी श्रीलंका दौऱ्यातही कायम ठेवावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!