Share

‘आमच्या जिवाचं बरं वाईट झाल्यास नेते जबाबदार’; दिशा सालियानच्या पालकांच्या भावना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुलीच्या आत्महत्येनंतर सुरू असलेले राजकारण वाईट असून आम्हालाही जगू द्या, असे भावूक आवाहन दिशा सालियन हिच्या पालकांनी केले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर या मुद्यावर पुन्हा राजकारण सुरू झाले होते. सध्या सुरू असलेल्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झालो असून आमच्या जीवाचे बरं वाईट झाल्यास नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही दिशा सालियनच्या आई-वडिलांनी म्हटले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्यांसह दिशा सालियनच्या पालकांची भेट घेतली. या भेटीमध्ये दिशा सालियनच्या आई वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी माध्यमांद्वारे आवाहन केले. दिशाच्या आई म्हणाल्या की, मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांना या आधीच सगळी माहिती दिली आहे. मुलीच्या आत्महत्येवर उगाच राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले.

सोलापुरात आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपली चाकणकर यांचा देखील दौरा आहे, माध्यमांशी बोलत असताना दिशा सालीयन केस प्रकरणातला सविस्तर अहवाल मालवण पोलिसांना सादर करण्याचे निर्देश दिल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!