Share

IND vs ENG : ऋषभ पंतच्या धडाकेबाज कामगिरीमागे ‘हा’ खेळाडू, ट्विटने केला खुलासा; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऋषभ पंतने मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाबाद शतक ठोकले. या दमदार कामगिरीमुळे त्याने टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे. पंतने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलेच शतक झळकावले आहे. कोणत्याही क्रिकेट खेळाडूसाठी त्याचे पहिले शतक हे नेहमीच खास असते. पण, पंतची ही खेळी केवळ त्याच्यासाठीच नाही तर टीम इंडियासाठीही खास ठरली. कारण त्याच्या नाबाद १२५ धावांच्या जोरावर भारताने तिसरा एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला. भारताने इंग्लंडविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत २-१ अशी बाजी मारली. तब्बल ८ वर्षांनंतर इंग्लंड संघ मायदेशातील एकदिवसीय मालिकेत पराभूत झाला आहे. भारतीय संघ आता आगामी काळात एकदिवसीय आणि टी-२० मालिकांसाठी वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे.

या सामन्यात ऋषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा भारताची ३८ धावांवर ३ गडी बाद अशी अवस्था होती. पंतने प्रथम सूर्यकुमार यादवसोबत ३४ धावांची भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढलं. त्यानंतर हार्दिक पंड्यासोबत दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी १३३ धावांच्या भागीदारीने इंग्लंडला पराभावकडे खेचले. त्यानंतर इंग्लंड संघाला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. ऋषभ पंतने या सामन्यात शतकीय खेळी साकारली. आता पंतच्या या कामगिरी मागे कोणत्या खेळाडूचा हात आहे हे समोर आले आहे. याबाबतचा खुलासा एका ट्विटने केला आहे.

मँचेस्टरमधील ऋषभ पंतच्या शतकीय खेळीनंतर युवराज सिंगने त्याचे अभिनंदन करण्यासाठी एक ट्विट केले होते. युवराज ने या ट्वीटमध्ये लिहिलेल्या माहितीप्रमाणे असे वाटते की, ऋषभ पंतच्या कामगिरी मागे त्याचाच हात होता. युवराजने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “४५ मिनिटांचे संभाषण सार्थकी लागले असून त्याचे फळ मिळाले. ऋषभ पंत चांगला खेळला. तुम्ही तुमचा डाव असा बनवला पाहिजे. हार्दिकलाही दमदार फलंदाजी करताना पाहून आनंद झाला.”

युवराजचे ट्विट वाचल्यानंतर असे दिसते की, तिसर्‍या सामन्यापूर्वी त्याने पंतशी संवाद साधला होता. मात्र, या दोघांमध्ये काय बोलणे झाले, याचा खुलासा युवराजने केला नाही. पण, एक गोष्ट नक्की, युवराजच्या शब्दांचा पंतवर नक्कीच भरपूर परिणाम झाला आणि त्याने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये पहिले एकदिवसीय शतक झळकावले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!