औरंगाबाद: ‘युवासेना आज महाराष्ट्रातील शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहचली आहे. आणि या पाठीमागे आदित्य ठाकरेंचे नेतृत्व आहे. आजची युवासेना हि त्यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करु शकत आहे. त्यामुळे मी आदित्य ठाकरेंची जागा घेईल असे काहीही नाही’. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई बोलत होते. शुक्रवारी (दि.१३) औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत युवासेना प्रमुख पदी त्यांच्या नावाच्या होत असलेल्या चर्चांना त्यांनी विराम दिला.
राज्याचे पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा संपर्क मोहीम, वॉर्डनिहाय बैठक अभियान राबवण्यात येत आहे. राज्याच्या दौऱ्यावर असलेले युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी मराठवाड्यातील बीड येथून पदाधिकारी संवाद दौऱ्यास सुरुवात केली. शुक्रवारी औरंगाबादेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत युवासेनेत आदित्य ठाकरेंची जागा आपण घेणार का? या प्रश्नावर त्यांनी दिलखुलास उत्तर दिले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, युवा सेना महाराष्ट्रातील ककानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. विविध पक्षातील मान्यवर मंडळी युवा सेनेत प्रवेश करत आहेत ते फक्त आणि फक्त आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे पाहूनच. हा संवाद दौरा देखील त्यांच्या सूचनेनुसार सुरू आहे. यामध्ये विविध कार्यकारिणी सदस्य देखील सहभागी झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चांना काहीही अर्थ नाही. आपण युवासेना प्रमुख पदी फक्त आणि फक्त आदित्य ठाकरेंना पाहतो असे म्हणून त्यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- नागपंचमी नव्हे हि तर जुगाऱ्यांची ‘पत्ते पंचमी’! याच दिवशी शिऊरला सर्रास भरता पत्त्यांचे डाव
- इंधन दरवाढीचा ‘असा’ही फटका; एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण!
- ट्विटरनंतर आता राहुल गांधींचे इन्स्टाग्राम खातेही होणार बंद?
- ‘हिंदुत्व आम्हाला कोणी शिकाऊ नये’, संजय राऊतांचा टोला
- चित्रा वाघ यांनी काढला उदय सामंत यांचा ‘रेकॉर्ड’; म्हणाल्या, ‘त्यांनी क्लीनचिटवर बोलणं हे हास्यास्पद’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

