मुंबई : राज्यात भाजप आणि शिवसेना अनेक वेळा एकमेकांवर चिखलफेक करत असते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे प्रकार अधिकच वाढत आहे. विरोधकांच्या दिल्लीतील बैठकांना खासदार संजय राऊत यांची उपस्थिती असते. अनेकांना संभ्रम निर्माण झाला की, शिवसेना युपीआयमध्ये गेले की काय? यावर राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, जर राम मंदिराला विरोध करणारे रामविलास पासवान बीजेपी सोबत जात आहे. तर आम्ही आम्हला वाटेल ते करू शकतो. जस मुख्यमंत्री आणि पंतप्रधान भेटणं चीकीचे नाही. तसेच युपीएने बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींना भेटणं काय वाईट आहे? तसेही आम्ही महाराष्ट्रात आम्ही एकत्र सत्तेत आहोत.
तसेच आम्ही कुठे जायचे ते भाजपने आम्हाला शिकवू नये, शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम आहे, आम्ही ठरवू कुठे जायचे ते आमच्या कडे आमचा गुगल मॅप आहे. हिंदुत्व आम्हाला कोणी शिकवू नये, असे देखील राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हा फक्त माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न नसून करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न’
- चिक्की घोटाळ्याबाबत न्यायालयाने खडसावल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले
- स्वातंत्र्य दिनाच्या पर्वाला राज्यपाल कोश्यारी दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर
- सरकारने थापा मारणे बंद करावे; सायरस पूनावाला यांच्या मोदी सरकारला कानपिचक्या
- १२ आमदारांचा वाद; ‘राज्यपाल उत्तर देण्यास बांधिल नाहीत, त्यांना आम्हीही निर्देश देऊ शकत नाही’, हायकोर्टाचे स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

