औरंगाबाद : शहरा जवळील गजानन हेरीटेज येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व महसूल विभागाच्या वतीने स्थानिक शेतकरी व विविध शेतकरी समूह व महिलांच्या गट सहाय्याने रानभाजी महोत्सव, ई-पिक पाहणी कार्यशाळा व पिक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्गाचेआयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार उदयसिंग राजपूत याच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उपविभागिय अधिकारी जनार्दन विधाते, तहसिलदार संजय वारकड, तालुका कृषि अधिकारी बाळराजे मुळीक,कृषी भूषण अजय जाधव,पंचायत समितीचे कृषीअधिकारी दिनकर जाधव, अनिल ठाकरे, राहणे,जिल्हा पिक वीमा कंपनी समन्वयक रामनाथ पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पावसाळ्यात रानावनात व शेती बांधावर विविध प्रकारच्या रानभाज्या आढळून येतात यामध्ये वन औषधी भाज्यांचा सुद्धा समावेश असतो,अशा रान भाज्यांचे रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने सर्व सामान्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये अडुळसा, वावडिंग, पार्थी, चूंजू, सोन तरोटा, तांदुळजा रानकुरकुंदा आदी भाज्यांचा यात समावेश होता, यावेळी महसूल विभागाकडून पिक पाहणी कार्यशाळा व पिक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तलाठी विकास वाघ यांनी इ – पीक पाहणी अँड्रॉइड ऍप बाबत उपस्थित तलाठी,ग्रामसेवक व कृषिसेवक यांना मार्गदर्शन केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपी संजय राठोड अद्यापही मोकाट कसा?’, चित्रा वाघ यांचा सवाल
- ‘चिक्की घोटाळ्यात अजून गुन्हा का दाखल केला नाही?’, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
- ‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

