🕒 1 min read
औरंंगाबाद : पूर्ववैमनस्यातून युवकाचा गळा चिरून हत्या केल्यानंतर मारेकNयाने त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२०) सकाळी उघडकीस आला. युवकाचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची घटना वुंâभेफळ शिवारातील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपासमोर घडली. शेख आमीर शेख नजीर (वय २०, रा.दर्गाह मशिदजवळ, नारेगाव) असे मयत युवकाचे नाव आहे.
वुंâभेफळ शिवारात असलेल्या इंडियन पेट्रोलपंपाजवळील मोकळ्या जागेत एका युवकाचा जळालेला मृतदेह पडून असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेतमाळस आणि स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जळालेल्या मृतदेहाचे फोटो आणि माहिती सोशल मिडियावर व्हायरल केली होती. त्यानंतर मयत युवकाचे नाव शेख आमीर शेख नजीर (रा.नारेगाव) असल्याचे समजले. पोलिसांनी मयत शेख आमीर शेख नजीर याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात दाखल केला, असून या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे, उपनिरीक्षक संदीप साळुंके, गणेश राऊत, पोलिस अंमलदार श्रीमंत भालेराव, धीरज जाधव, संजय तांदळे, योगेश तरमळे, विक्रम देशमुख आदींच्या पथकाने तपासाची चव्रेâ फिरवून शेख आमीर शेख नजीर याची हत्या करणाNया संशयीत युवकास ताब्यात घेतले असून सायंकाळी उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी करण्यात येत होती.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरला येणारा ऑक्सिजन टँकर पुण्यात अडवला, वेगळ्या भाषेचा उपयोग केल्यानंतर सोडला – थोरात
- घाटीच्या सुपर स्पेशालिटी इमारतीमध्ये ऑक्सिजन टँक बसवला
- संचारबंदीत नाथ घाट परिसरात फटफटी गँगचा धुमाकूळ!
- कोरोनामुळे झालेले मृत्यू म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने केलेली हत्या- खासदार जलील
- सुनेच्या खून प्रकरणी सासू-सासऱ्याला तीन महिन्यानंतर अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
