औरंगाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा निर्णय अतिशय चुकलेला आहे. याबाबत औरंगाबाद युवक काँग्रेस पक्षातील वरिष्ठ वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देणार आहोत. मराठवाड्यासाठी अतिशय महत्वाच्या क्रीडा विद्यापीठाला औरंगाबादेत पुन्हा आणण्यासाठी युवक काँग्रेस संपूर्ण ताकदीने मैदानात उतरुन प्रयत्न करेल, असे मत औरंगाबाद युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फर खान पठाण यांनी व्यक्त केले.
औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठाच्या घोषणेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याविरोधात शहरातील विविध पक्षीय नेते, तज्ज्ञ यांच्यातून विरोधाच्या प्रतिक्रिया उमटत आहे. याबाबत पुढे बोलतांना मुजफ्फर खान म्हणाले, औरंगाबादच्या वाट्याला आलेले हे विद्यापीठ पुण्याला नेण्यात आले आहे. हे अतिशय चुकीचे असून याबाबत आम्ही आमच्या काँग्रेस पक्षातील महाविकास आघाडीत सोबत असलेल्या मंत्री अमित देशमुख, बाळासाहेब थोरात यांना निवेदन पाठवणार आहोत. या निवेदनात मुख्यत्वे करून औरंगाबादला घोषित झालेले क्रिडा विद्यापीठ पुन्हा औरंगाबादलाच मिळायला हवे हि मुख्य मागणी करणार आहोत.
युवक काँग्रेस यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या करोडी येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा खेलो इंडिया स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कास्टिंग काऊच करणाऱ्यांना तात्काळ अटक करा’; राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ धाडसी अभिनेत्रीचं कौतुक
- महाराष्ट्राला झिका विषाणूचा धोका ; केंद्र सरकारने पाठविले उच्चस्तरीय पथक
- ‘छत्रपती शिवरायांच्या नावाला जरी धक्का लावला तर…’ शिवसेनेचा अदानी समुहाला इशारा
- एरवी दिल्लीतील मुद्द्यावरून गोंधळ घालणारे पडळकर, मुख्यमंत्री गल्लीत येऊन गेले तरी शांत का?
- ‘आमचे सरकार टेक्नोलॉजीचे मिशन बनवण्याच्या विचारात’ – पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

