🕒 1 min read
मुंबई : महापूर व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगली दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, आयर्विन पुल, हरभट रोड येथे भेट दिली. तसेच सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
या दौऱ्यादरम्यान सांगलीतील हरभट रोडवर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी आमनेसामने आले. निवेदन देण्यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही कार्यकर्त्यांना दूर करत शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या गोंधळात मुख्यमंत्री ठाकरे निवेदन न स्विकारताच पुढे निघून गेले. तर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार करावा लागला.
या प्रकरणामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात रान पेटवले आहे. परंतू सांगलीतील आटपाडीमधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपींचद पडळकर यांनी मात्र या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. एरवी दिल्लीतील मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका करणारे पडळकर शांत असल्याचे चित्र आहे.
सोशल मीडियावरून विविध प्रश्नांवरून आक्रमक पावित्रा घेणारे, रस्त्यावर उतरून आंदोलन घेणाऱ्या पडळकरांनी मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या जिल्ह्यात येऊन गेले तरी त्यावर एक चकार शब्दही काढला नाही. एवढेच नव्हे तर सांगलीत हरभट रोडवर भाजप कार्यकर्त्यांना मु्ख्यमंत्री पाठ दाखवून निघून गेले. शिवसैनिकांसोबत वादही झाला. पोलिसांच्या काठ्या अंगावर पडल्या. तरीही पडळकर शांत का आहेत असा प्रश्न राजकीय वर्तुळात सुरू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना! ‘अदानी एअरपोर्ट’ची तोडफोड करताना शिवसैनिकांचा पाहा हा व्हिडिओ
- भाजप कार्यकर्त्यांना पाहून सांगलीत मुख्यमंत्री ठाकरेंनी पळ काढला? पाहा हा व्हिडिओ..
- ‘थप्पड मारण्याची वल्गना करणारा वाघ ३०-४० लोकांना पाहून भीतीने गाडीत लपून बसला!’
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

