Share

‘आमचे सरकार टेक्नोलॉजीचे मिशन बनवण्याच्या विचारात’ – पंतप्रधान मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही वेळा पूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या ‘ई-रुपी’चं उद्घाटन करण्यात आले आहे. यामध्ये e-vouchers च्या माध्यमातून व्यवहार केले जाणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी जनतेला संबोधित देखील केले आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले कि, आज देश डिजिटल माध्यमाला एक नवं स्वरूप देत आहे. देशातील डिजिटल व्यवहारांमध्ये डीबीटी अधिक प्रभावी बनवण्यासाठी eRUPI व्हाऊचर मोठी भूमिका बजावणार आहे. हे Targeted, Transparent आणि Leakage Free Delivery मध्ये प्रत्येकास मदत करणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले आहे.

तसेच ‘आमचं सरकार टेक्नोलॉजीचं मिशन बनवण्याचा विचार करते, तेव्हा अनेक नेते आणि काही तज्ज्ञ त्यावर प्रश्न उपस्थित करतात. पण भारतानं आज जगाला दाखवून दिलंय. टेक्नोलॉजी आत्मसाद करण्यात भारत मागे नाही. भारत देशातील मोठ्या देशांसोबत मिळून ग्लोबल लीडरशिप देण्याची क्षमता ठेवतो. आमच्या सरकारनं पीएम स्वानिधी योजनाही सुरू केली. आज देशातील छोट्या-मोठ्या शहरांमधील 23 लाखांहून अधिक रस्त्यावर दुकानं थाटणाऱ्यांना त्या योजनेची मदत झाली आहे.

कोरोनाच्या संकटातही त्यांना 2300 कोटी रुपये देण्यात आलेत. देशात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल ट्रान्झेक्शनसाठी गेल्या 6 ते 7 वर्षांत जे काम झालंय, त्याचं जगभरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे भारतात फिनटेकचं एक मोठा आधार मिळालाय. असा आधार तर मोठमोठ्या देशांनाही मिळालेला नाही,’ असे देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान E-RUPI हे कोणतेही प्लॅटफॉर्म नाही तर ते व्हाऊचर विशिष्ट सर्व्हिस साठी आहे. E-RUPI वापरताना तुमचं बॅंक अकाऊंट नसेल, तुमच्याकडे डिजिटल पेमेंट अ‍ॅप, स्मार्टफोन नसेल तरीही वापर केला जाऊ शकतो. ही वाऊचर्स प्रामुख्याने आरोग्याशी निगडीत आर्थिक व्यवहारांसाठी केला जाणार आहे. कॉर्पोर्ट्स कडून त्यांच्या कर्मचार्‍यांना ही वाऊचर्स दिली जाऊ शकतात. केंद्राने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार कोविड 19 लसीकरणामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये लसीकरणासाठी ही वाऊचर्स गिफ्ट्सच्या स्वरूपात दिली जाऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!