🕒 1 min read
मुंबई : अदानी उद्योग समूहाने मुंबई विमानतळाला ‘अदानी एअरपोर्ट्स’ असे नाव लावलं होतं. या संदर्भात अनेक तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आणि भारतीय कामगार सेनेने विमानतळाला लावलेले अदानी एअरपोर्ट्सचे नाव आज फोडून टाकले. त्यामुळे एक नवा वाद सुरू झाला आहे.
यावर शिवसेनचे नेते व भारतीय कामगारसेनेचे सचिव सचिन अहिर यांनी अदानी समूहाला सोशल मीडियाद्वारे अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. ते म्हणले, ‘महाराष्ट्रात जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक व भारतीय कामगार सेना हे सहन करून घेणार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी व भारतीय कामगार सेनेने उचललेले पाऊल अगदी योग्य आहे. महाराष्ट्रात ही बंडखोरी सहन केली जाणार नाही,’ असे ते म्हणले.
महाराष्ट्रात जर कोणी छत्रपती श्री.शिवाजी महाराजांच्या नावाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक व भारतीय कामगार सेना हे सहन करून घेणार नाही.त्यामुळे शिवसैनिकांनी व भारतीय कामगार सेनेने उचललेले पाऊल अगदी योग्य आहे.महाराष्ट्रात ही बंडखोरी सहन केली जाणार नाही@OfficeofBKS
— Sachin Ahir (@AhirsachinAhir) August 2, 2021
दरम्यान, या तोडफोडीनंतर अदानी समुहाने स्पष्टीकरण दिले आहे. ‘या ठिकाणी व्यवस्थापनाचे अधिकार असलेली आधीची कंपनी ही जीव्हीके कंपनी होती. जिथे जीव्हीकेचे ब्रॅन्डिंग होतं तिथे अदानी एअरपोर्ट ब्रॅन्डिंग करत आहे’ असा खुलासा करण्यात आला आहे. मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. मुंबई विमानतळाचा ताबा मिळताच विमानतळावर व बाहेर अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज व्हीआयपी गेट नंबर ८ आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रत्येक यशस्वी ऑलिम्पिक मेडल विजेत्याच्या मागे पंतप्रधानांचा मोठ्ठा फोटो असतो; भाई जगताप यांची टीका
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

