Share

मराठा आरक्षण : सरकार मराठा समाजाची थट्टा करत आहे : समरजितसिंह घाटगे

Published On: 

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने काल नकार दिला आहे. महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणं देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

घटनापीठासमोर आजच हे प्रकरण आलं आहे. त्यावर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे यावर युक्तिवाद झाल्यावरच निर्णय घेण्यात येईल, असं सांगत घटनापीठाने हा स्थगिती उठवण्यास नकार दिला. २५ जानेवारीला यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, न्यायालयात घडलेल्या घडामोडींवर विविध स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका मांडत नाही. महाविकास आघाडी सरकार मराठा समाज्याची थट्टा करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याची टिका भाजपचे जिल्हा (ग्रामीण)जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. यामुळे शांत असणारा मराठा आता तीव्रतेने सरकार विरूध्द आक्रोश करेल, असा इशाराही घाटगे यांनी दिला.

मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यात सरकारला आपली बाजू मांडता आली नाही. सरकार मराठा समाजाची थट्टा करत आहे. न्यायालयात मराठा समाजाची भूमिका मांडण्यासाठी आमची तयारी आहे, हे वारंवार सांगणारे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटतच नाही. सरकार मराठा समाजाची बाजू मांडू शकत नाही . शांत आणि संयमी आंदोलन करणाऱ्या मराठ्यांची भविष्यात सरकारविरूध्द आक्रोश मोर्चे सुरु होतील, असेही घाटगे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!