मुंबई : बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबण्यात आले होते. या घटनेबाबत राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रीया देताना भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्य मंत्र्यांवर टीका केली आहे. आरोग्य मंत्री केवळ तोंडपाटीलकी करण्यात बिझी असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
अंबेजोगाईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २२ रुग्णांच्या मृतदेहांना एकाच रुग्णवाहिकेतून अंतीम संस्कार करण्यासाठी नेण्यात आले होते. यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून भातखळकर यांनी टीका केलीय. ते म्हणाले की, ‘२२ कोविड रुग्णांचे मृतदेह एकाच ऍम्ब्युलन्समध्ये कोंबून स्मशानभूमीत नेण्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे घडला आहे. आरोग्य व्यवस्थेचा, मूलभूत सुविधांचा राज्यभर बोजवारा उडाला असून आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी आहेत.’
राज्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असताना आरोग्य यंत्रणा अपूरी पडत आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच भाजप आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, त्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नाहीये. त्यातच आता अंबेजोगाईमधील हा प्रकार संतापजनक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आमची लोकं मरायला लागलीत, तुम्ही जीआर काय दाखवताय ? महापालिकेत वसंत मोरेंचा रौद्रावतार
- राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आंदोलनाचा गिरीश महाजनांकडून समाचार
- ‘पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे ‘त्याने’ दाखवून दिले’, आव्हाडांचा निशाणा कोणावर?
- औरंगाबादेत एकाच दिवसात ‘रेकॉर्डब्रेक’ साडे अकरा हजार जणांचे लसीकरण!
- ‘बेस्ट’ सेवा बजावणाऱ्या सिल्लोडच्या बस वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

