Share

सावरखेडा घाटात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: 

औरंगाबाद : सावरखेडा (ता.सोयगाव) घाटात राखीव जंगलातील सागाच्या झाडाला गळफास घेऊन ३१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि.३ उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या घटनेची फर्दापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. संतोष शिवाजी हाके (३१, रा.सिरसाळातांडा ता.सिल्लोड) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, मयत संतोष शिवाजी हाके यांनी सोयगाव शिवारातील शेतजमीन ठोक्याने कसण्यासाठी घेतली होती. शुक्रवारी दि.२ सकाळी ९ वाजेच्या सुमारास सोयगाव शिवारातील शेतात जाऊन येतो असे घरी सांगून ते सिरसाळातांडा येथून सोयगाव कडील शेतात जाण्यासाठी निघाले होते.

मात्र संपूर्ण दिवस व रात्र उलटूनही ते घरी न परतल्याने शनिवारी सकाळी नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता सावरखेडा घाटात राखीव जंगलातील सागाच्या झाडाला गळफास घेऊन संतोष यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!