Share

‘बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा तमाम वारकऱ्यांचा अपमान’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाहीये. यासोबतच, हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्विकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांनी पायी वारी करावी असं म्हटलं होतं.

राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले होते. यामुळे आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आता या प्रकरणामुळे टीका केली आहे. ‘हा महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे. हे सरकार आता वारकऱ्यांनासुद्धा सोडत नाही. अशाप्रकारे राज्य सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे.’ असा घणाघात त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.

‘कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारनं पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र, पायी वारी व्हायला हवीचं, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली. असं असताना आज पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे. हे सरकार आता वारकऱ्यांनासुद्धा सोडत नाही. अशाप्रकारे राज्य सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे,’ असे टीकास्त्र त्यांनी डागले आहे.

तसेच, ‘कोरोनाचा धोका अदयापही कायम असताना वाईन शॉप, बार सुरु करण्याची परवनागी देण्यात येते, मात्र लाखो भक्तांची श्रध्दास्थाने असलेली मंदिर मात्र उघडण्यास राज्यसरकारकडून परवानगी का दिली जात नाही,’ असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!