🕒 1 min read
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी आरक्षणावरून पत्र लिहिलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. ओबीसी आरक्षण राज्याने नाही तर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्बवली आहे, असा टोला नवाब मलिक यांनी राज्यपालांना लगावला आहे.
नवाब मलिक माध्यमांशी चर्चा करताना म्हणाले, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्यपालांनी पत्रात जे नमूद केले आहे ते खरे नाही. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. कोर्टाच्या आदेशावरून ही महाराष्ट्रातील ओबीसींवर ही परिस्थिती आली आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले नाही याची माहिती बहुदा राज्यपालांना असायला हवी होती, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही. दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र राजकीय उद्देश ठेवून लिहिण्यात आले.(१/२)#OBCreservation #OBC pic.twitter.com/bXthNMjniV
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 1, 2021
ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि दिलेल्या निर्णयाबाबतची माहिती राज भवनातील अधिकारी राज्यपालांना देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही, अशा शब्दात मलिक यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र राजकीय उद्देश ठेवून लिहिल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यपालांनी काय म्हटलं होतं पत्रात?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून त्यांचं ओबीसी आरक्षणासह इतर गोष्टींवर लक्षं वेधलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ २३ जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा, असं राज्यपालांनी या पत्रात म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
- ‘शोषित-वंचित घटकांचा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या पडळकरांकडे ५० लाखांची गाडी कशी?’
- ‘चपटी लावलेली असली की लोक हत्तीलाही मुंगी समजतात’, आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा
- ‘अपयश झाकण्यासाठी भुजबळ आणि वडेट्टीवारांकडून खोटारडेपणा सुरू’, आ.अतुल सावेंचा आरोप
- ‘गाडीवर हल्ला झाल्याने राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर’, पडळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
