Share

‘आपला जावई 8 महिने झालं जेलमध्ये आहे, त्याचं काय ते बघा, आधी त्याला निर्दोष सिद्ध करा’

Published On: 

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. त्यावर समीर वानखेडेंच्या दुसऱ्या पत्नी आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मौलानांचे दावे फेटाळून लावले आहेत. मौलानांनी माहिती घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरही शरसंधान साधलं आहे.

नवाब मलिक काय वाटेल ते बोलत आहेत, त्यांचा जावई आठ महिने आत होता. त्यांनी त्याचं काय ते आधी बघावं, कागदपत्रं तपासावीत, त्याला निर्दोष सिद्ध करण्याचे प्रयत्न करावेत. माझे पती निष्पक्ष कारवाई करत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक डागही नाही. त्यामुळे त्याला अडकवण्याचा प्रयत्न करु नये. नवाब मलिक यांना मी विनंती करते तुम्ही खूप इज्जतदार माणूस आहात. तुम्ही एका चांगल्या मंत्र्यासारखे वागा. कोर्टात जाण्याचा निर्णय माझे सासरे आणि नणंद घेतील, अशी माहिती क्रांती रेडकर यांनी दिली आहे.

निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र माझा नवरा आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अ‌ॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो, असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!