Share

मौलाना अहमद यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती; क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. त्यावर समीर वानखेडेंच्या दुसऱ्या पत्नी आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मौलानांचे दावे फेटाळून लावले आहेत. मौलानांनी माहिती घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी दिली आहे.

निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र माझा नवरा आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अ‌ॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो, असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

स्पेशल मॅरेज अ‌ॅक्ट अंतर्गत दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्ती लग्न करतात. त्यांनी धर्म लपवल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. त्यावर नवरा-बायको दोघांच्या सह्या आहेत. मी हिंदू असल्याने इस्लाम धर्माची तेवढी मला माहिती नाही. पण मौलानांनी संविधानानुसार पाहिलं तर समीर तेव्हाही हिंदू होते. त्यांनी माहिती घ्यायला हवी होती, जी त्यांनी घेतली नाही, असं क्रांती म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!