🕒 1 min read
मुंबई : वाढती महागाई, इंधन दरवाढ तसेच राज्यातील विविध प्रकल्पासांठी मंजूर झालेला निधी यावरून पुन्हा भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे एका कार्टूनमधून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
नितेश यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक कार्टून पोस्ट केले आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, कामगारांना मिळालेला बोनस आणि वाढती महागाई यातील तफावत दर्शवली आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधी वाटपाचे चित्रही दिसत आहे. याला अनुसरुन ‘वसूलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी आणि जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दरिद्री’ असा खोचक’ टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. स्वत:ची तिजोरी फुल, जनतेची मात्र दिशाभूल असे म्हंटले आहे.
वसूलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी
जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दरिद्री@BJP4Maharashtra pic.twitter.com/u7Oq6IzV9o— Nitesh Rane (@NiteshNRane) November 3, 2021
दरम्यान, नितेश राणे यांच्या या ट्वीटमुळे विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतील यावर सध्या सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
