मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच संपूर्ण पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने अजित पवारांना नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या वकिलांनी अत्यंत महत्वपूर्ण खुलासा केला आहे.
यासंदर्भात माध्यमांसमोर स्पष्टीकरण देत अजित पवारांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की,’उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल’, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मी दाखवतो कोण पार्ट्या करतात; नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा
- ‘अहो राऊत, परमबीर सिंहांना अजून तुम्ही पदावरून दूर ही केलं नाही, अन्..’, भाजपचा घणाघात
- ‘ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी गुन्हे शाखेत आणि EOWला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत’
- दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादा पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान; मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप
- शिवसेनेच्या वाघिणीने मैदान मारलं, मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दारूण पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

