Share

पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Published On: 

नांदेड : देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाला लागला असून काँग्रेसचे नवखे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर ४० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे काँग्रेसचा हा विजय भाजपासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात असतांनाच जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचे वक्तव्य भाजपचे सुभाष साबने यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलतांना साबने म्हणाले की,’जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो. कोणाला निवडून द्यायचं हे जनतेच्या हातात असते. त्यामुळे हा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे. या निवडणुकीत ज्या उणिवा राहिल्या त्यावर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा केली जाईल. भविष्यात आमचा पराभव होणार नाही, असी रणनीती आगामी काळात केली जाईल,’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’शिवसैनिक माझ्यावर नाराज आहेत, असं मला प्रचारदरम्यान कुठेही वाटलं नाही. मी भाजपमध्ये आलो. भाजपचा एखादा गट नराज आहे, असे कुठेही दिसले नाही. एक टीम म्हणून आम्ही प्रचार केला. मी आता जिथे आहे तिथेच राहणार आहे.’ तसेच वंचित बहुजन आघाडीचा फटका भाजपला बसला. वंचित बहूजन आघाडीने जी मतं घ्यायला हवी होती ती घेतली नाही. त्यामुळे मोठा फटका बसला, असेही साबने यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!