Share

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य परिवहनचे कर्मचारी बसचालक दिलीप काकडे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. याच पार्श्वभूमीवर शेवगाव येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असतांना काकडे यांच्या आत्महत्येप्रकरणी परिवहन मंत्र्यांवर ३०२ चा अर्थात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.

यावेळी बोलत असतांना धोत्रे म्हणाले की,’बसचालक दिलीप काकडे यांनी आत्महत्या केली असून त्यांनी परिवहन कर्मचार्‍यांच्या मागण्यासाठी बलिदान दिले आहे. शासनाने परिवहन कर्मचार्‍यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजे. परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून आता इंधनदरवाढीमुळे एसटीनेच प्रवास करावा लागत आहे. एसटीचे कर्मचारी हे जोखमीचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत. यामुळे एसटीचे कर्मचारी व एसटी वाचली पाहिजे, ही भुमिका मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची आहे. या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’राज्यातील तिघाडी सरकार व भाजपा हे आपआपसातच सत्तेसाठी भांडत आहेत. यामुळे इतर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. परिवहन कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. मात्र तसे न होता अनावश्यक गोष्टीवर कोट्यांवधींचा खर्च केला जात आहे. मात्र परिवहन कर्मचार्‍यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना काळात सर्वसामान्यांची काळजी घेण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना आणली. मात्र मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांची काळजी घेण्याऐवजी फक्त आपल्याच कुटुंबाची काळजी घेतली. मात्र या करोना संकटाच्या काळात मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांच्या मदतीला धावल’, असेही धोत्रे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!