मुंबई : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला विजय म्हणजे महाविकास आघाडी सरकारवर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधतांना दिली आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासंदर्भात प्रतिक्रिया देत म्हणाले की,’भाजपने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.’
दरम्यान, विकासाच्या मुद्द्याच्या बाजूने कौल…राज्यातील जनता महाविकास आघाडीसोबत आहे, हे देगलूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले. सामूहिक प्रयत्नांना विजयाचे फळ आले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते व राज्याचे ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देगलूरच्या विजयाबद्दल अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी गुन्हे शाखेत आणि EOWला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत’
- दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादा पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान; मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप
- शिवसेनेच्या वाघिणीने मैदान मारलं, मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दारूण पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

