Share

ग्रामपंचायत निवडणुकीत ‘यंग ब्रिगेड’ची धूम!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. एकूण विजयी झालेल्या उमेदवारांपैकी ३० टक्के तरुण कारभारी निवडून आलेत. विजयी उमेदवारांत तिशीच्या आतील तरुणाईची संख्या अधिक आहे. या नव्या दमाच्या चेहऱ्यांनाही राजकारणातील प्रवेश आश्वासक जाणवत आहे. गावासाठी काही तरी करून दाखवण्याची संधी त्यांना मतदारांनी दिली आहे. त्यापैकी अनेकांना केवळ सदस्य म्हणून अनुभव घेण्यात इंटरेस्ट आहे. तर अनेकांना पहिल्यांदात सरपंचपद मिळण्याची अपेक्षा आहे.

जिल्ह्यात ४६९९ सदस्यांच्या या निवडणुकीत ६१० सदस्य बिनविरोध निवडून आले होते. १६ जानेवारीला ४०८९ सदस्यांची प्रत्यक्ष निवडणूक झाली. त्यासाठी ११ हजार ४९९ उमेदवार रिंगणात होते. वैजापूर १०५, सिल्लोड ८३, कन्नड ८३. पैठण ८०, औरंगाबाद ७७, गंगापूर ७१, फुलंब्री ५३, सोयगाव ४०, तर खुलताबादमध्ये २५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. यात ३० टक्क्यांहून जास्त तरुण उमेदवार निवडून आलेत.

वैजापूर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तालुक्यातील २१ ते ३२ वयोगटातील सर्वाधिक सदस्य असण्याची शक्यता आहे. सरपंच पदाच्या सोडतीनंतर जिल्ह्यातील सर्व सदस्यांची माहिती निवडणूक यंत्रणेकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त होईल. त्यानंतर जिल्हा प्रशासन पंचायत विभागाला सदस्यांची जिल्ह्याची एकत्रित संकलित यादी देईल. तेव्हा नेमकी आकडेवारी समोर येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!