मुंबई : मुंबई क्रूझ प्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोपांची मालीकाच सुरु केली. त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावरही संशय व्यक्त केला होता. कालच मुंबई महानगरपालिकेने समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. या आरोपांना तिलांजली देण्यासाठी समीर वानखेडेंच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी त्यांचे जन्म प्रमाणपत्र ट्विट केले. त्यानंतर काही वेळेतच त्यांनी ते ट्विटरवरुन डिलीट केले. मात्र अनेकांनी ते शेअर केले आहे.
क्रूझ ड्रग्स कारवाईचे प्रकरण थेट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या धर्मावर येऊन पोहचले आहे. ते मुस्लिम आहेत की हिंदू यावरून वाद सुरू आहेत, अशातच मुंबई महानगरपालिकेने न्यायालयात कागदपत्रे सादर केले आहेत. वानखेडे यांच्या कागदपत्रात समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचं म्हटलं आहे, असं महापालिकेने हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता आणखी वेगळे वळण या प्रकरणाला मिळत आहे.
This is the real certificate of NCB Singham Sameer Wankhede @KrantiRedkar @jasmeen23_ Satyamev Jayate ????????????@nawabmalikncp High Court will reply to you soon, wait and watch. ???????????? pic.twitter.com/KDoRMHdK28
— Sandeep Phogat (@MrSandeepPhogat) November 17, 2021
या पूर्वी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात सांगितलं की, ते हिंदू महार आहेत आणि त्याची पत्नी झाईदा ही मुस्लिम होती पण त्यांनी हिंदू पद्धतीनुसार लग्न केलं. लग्नानंतर झाईदा हिंदू धर्मात समाविष्ट झाल्या. ज्ञानदेव वानखेडे यांनी स्वत:च आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळेच्या मार्कलिस्ट, पोलीस सेवेत असतानाचे कागदपत्रांचे इतर पुरावे कोर्टासमोर ठेवले.
मात्र आता मुंबई महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचे समोर आले आहे. नेमकी सत्यता काय यावरुन सोशल मिडीयावर सध्या चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरारी गुन्हेगार घोषित
- विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या; शरद पवारांचा फडणवीसांना टोला
- ‘एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं’
- मलाना क्रीम घेऊन बोलल्याने बापूंचे विचार संपणार नाहीत- नवाब मलिक
- राज्याने कर कपात करून जनतेला दिलासा द्यावा; नाना पटोलेंचा सल्ला

