Share

वानखेडेप्रकरणी नवाब मलिक यांचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल

Published On: 

मुंबई : केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी अजून काही कागदपत्रे सादर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या अर्जावर आज(१८ नोव्हें.)सुनावणी होणार आहे.

ज्ञानदेव यांनी मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावरील अंतरिम दिलासा देण्याबाबतचा निर्णय न्यायमूर्ती माधव जामदार यांनी मागील आठवडय़ात राखून ठेवला होता. मात्र, समीर यांच्यावर केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ आपल्याला त्यांच्या शाळेतील प्रवेशाचा अर्ज आणि त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मलिक यांच्यावतीने न्यायमूर्ती जामदार यांना करण्यात आली आहे.

दरम्यान, समीर हे जन्माने मुस्लीमच आहेत. तसेच समीर यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनुसूचित जातीचे असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप मलिकांवर करण्यात आला होता. आपला हा आरोप सिद्ध करण्यासाठीच समीर यांच्या शाळेतील प्रवेशाचा अर्ज आणि त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची परवानगी देण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!