नवी दिल्लीः कोरोनानंतर उद्योग व्यवसाय उभारी घेत आहेत. यामध्ये वाहन उद्योगांमध्ये नवनवीन अद्ययावत वाहने बाजारपेठेत यायला सुरुवात झाली आहे. सेडान कारची क्रेझ सध्या खूप असल्याचे पाहायला मिळते. मात्र कार घेण सर्वसामान्य माणसाला परडवणारे नसल्याने अनेकाचे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र आता कमी किंमतीत जबरदस्त मायलेज सोबत आरामदायक केबिन स्पेस देणारी स्वस्त सेडान कार संबंधी माहिती जाणून घेऊ.
दक्षिण कोरियाची प्रमुख वाहन निर्माता कंपनी Hyundai ची एंट्री लेवल सेडान Aura तुमच्यासाठी बेस्ट होऊ शकते. ही कार दोन पेट्रोल आणि डिझेल इंजिन सोबत कंपनी फिटेड सीएनजी किट सोबत चांगले मायलेज देते. एकूण पाच व्हेरियंट्समध्ये येणाऱ्या या कारची किंमत ५.९७ लाख रुपये ते ९.३५ लाख रुपये दरम्यान आहे. याच्या सीएनजी व्हेरियंटची किंमत ७.६७ लाख रुपये आहे.
जाणून घ्या फिचर-
- या सेडान कारची लांबी 3995mm, रुंदी 1680mm, उंची 1520mm आणि यात 2450mm चे व्हीलबेस दिले आहे.
- या कार मध्ये ३७ लीटरचे फ्युल टँक दिले आहे. याचा पेट्रोल व्हेरियंट २० किलोमीटर, डिझेल व्हेरियंट २५ किलोमीटर प्रति लीटर पर्यंत मायलेज देते.
- याच्या सीएनजी व्हेरियंट २८ किलोमीटर प्रति लीटर किलोग्रॅम पर्यंत मायलेज देते.
- फीचर्स म्हणून Hyundai Aura मध्ये कंपनीने ८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले आहे. हे अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉयड ऑटोने कनेक्ट होते.
- वायरलेस चार्जिंग, ऑटो एसी, हाइड अॅडजस्टेबल सीट, कूल्ड ग्लव बॉक्स, रियर आर्म रेस्ट, कप होल्डर, पॉवर विंडो, माउंटेड स्टीयरिंग व्हील आणि क्रूज कंट्रोल सारखे फीचर्स मिळते आहे.
- सेफ्टी म्हणून या कारमध्ये ड्युअल एयरबॅग इलेक्ट्रॉनिक्स ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन सोबत अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, रियर पार्किंग सेंसर आणि ISOFIX चाइल्ड सीट दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमावलीचं पालन करत तामिळनाडूसह दिल्लीमधील शाळा होणार सुरु
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- गांधी परिवाराची बदनामी करणारा व्हिडिओ केल्याप्रकरणी पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

