🕒 1 min read
मुंबई : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. हा मालिका विजय मिळवल्यानंतर अजिंक्यने ड्रेसिंग रूममध्ये एक भावनिक भाषण केले होते, त्यामध्ये त्याने सर्व खेळाडूंचे आभार मानले.
ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी विजय मिळाल्यानंतर अजिंक्यने ड्रेसिंग रूममध्ये भाषण केले होते. अजिंक्य म्हणाला,”ॲडीलेडमध्ये आपल्यासोबत जे काही झाले ते फारच निराशाजनक होते. मात्र, यानंतर आपण मेलबर्नमध्ये व मालिकेतील इतर सामन्यात जे पुनरागमन केले ते खरोखरच विशेष होते. या मालिका विजयात केवळ एक-दोन खेळाडूच नव्हे तर संपूर्ण संघाने उत्तम खेळ करत विजय मिळवला.”
As we draw curtains on our historic triumph and start our preparations for the home series, here’s Captain @ajinkyarahane88‘s address to #TeamIndia from the Gabba dressing room.
Full ????https://t.co/Sh2tkR5c7j pic.twitter.com/l7wr6UXSxq
— BCCI (@BCCI) January 23, 2021
भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका अतिशय रोमांचक ठरली. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने, तर दुसरा सामना भारताने जिंकला. सिडनी येथे झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने सर्वांच्या नजरा ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याकडे होत्या. ब्रिस्बेन येथे झालेला मालिकेतील शेवटचा सामना ऐतिहासिक ठरला.
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक विजयावर आनंद महिंद्रा खूश; या खेळाडूंना मिळणार SUV
- प्रकृती आणखी ढासळल्याने लालूंना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवले…
- जयंत पाटील सलग १८ दिवस दौऱ्यावर; ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत घेणार आढावा
- अजूनही हार्दिक दुःखातून सावरला नाही; वडिलांच्या आठवणीत झाला भावूक
- वनडे, टी-२० संघात पंतला ‘या’ फलंदाजाच्या जागी संधी मिळाली पाहिजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
