मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
या युवा संघातील शुभमन गिल, रिषभ पंत यांच्यासह अनुभवी चेतेश्वर पुजाराने केलेल्या खेळीमुळे भारत विजयाच्या जवळ आला. दरम्यान, ही मालिका जिंकण्यात भारताची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजाराचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. साहजिकच चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद पुजारा यांना लेकाच्या खेळीचा अभिमान वाटतोय.
पुजाराच्या या अविश्वसनीय खेळीबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून त्याचे कौतुक केले जात आहे. अशातच चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद पुजारा यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून ते मुलाच्या कामगिरीवर खुश आहेत.
अरविंद पुजारा म्हणाले, “फलंदाजी करताना चेतेश्वरच्या बोटाला व हेल्मेटला चेंडू लागल्याने निश्चितच आम्हाला चिंता वाटत होती. मात्र काही वेळानंतरच त्याने फलंदाजी करण्यास सुरुवात केली तेव्हा आम्हाला बरे वाटले.” अरविंद पुजारा यांच्यामते चेतेश्वर हा भारतीय संघाच्या फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे. पुजाराच्या वडिलांच्या मते त्याने आपल्या बॅकफुट खेळावर अधिक मेहनत करणे गरजेचे आहे. ते म्हणाले ,”चेतेश्वरला आपल्या बॅकफूटवरच्या खेळावर मेहनत घेणे गरजेचे आहे. इंग्लंड विरुद्ध आगामी मालिकेत त्याला यावर मेहनत घ्यावीच लागेल.”
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक विजयावर आनंद महिंद्रा खूश; या खेळाडूंना मिळणार SUV
- प्रकृती आणखी ढासळल्याने लालूंना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवले…
- जयंत पाटील सलग १८ दिवस दौऱ्यावर; ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत घेणार आढावा
- अजूनही हार्दिक दुःखातून सावरला नाही; वडिलांच्या आठवणीत झाला भावूक
- वनडे, टी-२० संघात पंतला ‘या’ फलंदाजाच्या जागी संधी मिळाली पाहिजे


